आपण पाहत आहोत रिपोर्टर न्यूज़ आज ची बातमी मुख़्तार मणियार यांच्या कडून
नांदुर्गा येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचा "हर घर दस्तक अभियान"
औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचा "हर घर दस्तक अभियान" मोहीम अंतर्गत घरोघरी जाऊन कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेचे उदघाटन नांदुर्गा ग्रामपंचायतचे सरपंच सौ.अश्विनी घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मातोळा अंतर्गत नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती फेरे यांच्या नेतृत्वाखाली नांदुर्गा, गुबाळ, नांदुर्गा तांडा, व नांदुर्गा भाग 2 आरोग्यवर्धिनी केंद्र परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मकरंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती सुरेश फेरे,अनुसया भोसले (आशा गट प्रवर्तक), श्रीमती रकसाळे सिस्टर, श्री स्वामी (MPW) तसेच सर्व आशा कार्यकर्ती यांनी हा उपक्रम राबवला
शासनाकडून आलेल्या प्रत्येक अभियान उत्स्फूर्तपणे नांदुर्गा आरोग्यवर्धिनी केंद्र मार्फत डॉ.स्वाती फेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे राबविण्यात येत असल्याची चर्चा नांदुर्गा ग्रामस्थ करीत आहेत..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.