माजी नगराध्यक्ष एस.आर. देशमुख यांचे निधन
पालकमंत्री अमित देशमुख यांनी वाहिली भावपूर्ण श्रृधांजली
लातूर,दि.6,(जिमाका):- आज लातूर येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या, माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते एस.आर. देशमुख यांच्या अंत्यविधीस पालकमंत्री अमित देशमुख उपस्थित राहुन त्यांचे अंत्यदर्शन घेतले,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
संघर्षमय जीवनातुन पुढे आलेले एस.आर.देशमुख हे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपले वाटायचे, राजकारणात वावरताना त्यांच्या वागण्यात कटुता नव्हती, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार तसेच गोतावळा मोठा होता.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक होते, आपल्या बरोबरही त्यांचा स्नेह होता त्यामुळे एक प्रकारे ते देशमुख कुटुंबियांचे पारीवारीक सदस्यच होते, त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशी भावना पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
लातूरच्या जडणघडणीत तसेच सहकार, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे, नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल. गणेश देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी अशी भावना श्रृद्धांजली अर्पण करताना त्यांनी व्यक्त केली .
एस. आर. देशमुख यांनी दिलेले योगदान
कायम स्मरणात राहणारे, नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
लातूरच्या जडणघडणीत तसेच सहकार, राजकीय, सामाजिक सह विविध क्षेत्रात माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. आर. देशमुख यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे, नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल, अशी भावना राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लातूर येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सोमवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मारवाडी स्मशानभुमी येथे पार पडलेल्या, माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. आर. देशमुख यांच्या, अंत्यविधीस उपस्थित राहुन त्यांचे अंत्यदर्शन घेतले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगीच्या शोकसभेत एस. आर. देशमुख आपल्यातून निघून गेले ही अत्यंत दु:खद घटना आहे. त्यांना कोणत्या शब्दात आदरांजली व्यक्त करावी यासाठी मला शब्द सूचत नाहीत, असे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले.
एस. आर. देशमुख यांची राजकीय जीवनाची सुरूवात लातूर येथून झाली. एक संघर्षशील जीवन त्याच राहील आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ते आपले वाटायचे, राजकारणात वावरताना त्यांच्या वागण्यात कटुता नव्हती, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार तसेच गोतावळा मोठा होता. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात त्यांनी चांगले कार्य केले आहे. या माध्यमातून ते आपल्या पैकी प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करून गेले आहेत. विविध क्षेत्रात काम करीत असतांना काँग्रेस पक्षाचे पाईक, आदरणीय विलासराव देशमुख व आदरणीय दिलीपराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि माझे ज्येष्ठ सहकारी ते राहीले आहेत. आम्ही त्यांच्याकडे नेहमीच आमचे एक वडीलधारी म्हणून पाहिल आहे. एका अर्थाने देशमुख कुटूंबाचा ते सदस्यच होते असे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
कोणतीही जबाबदारी एस. आर. देशमुख देशमुख यांच्यावर दिली तर ती पार पाडत, नाही हा शब्दच त्याच्या शब्दकोषात नव्हता. आदरणीय विलासराव देशमुख व आदरणीय दिलीपराव देशमुख यांची ढाल बनून त्यांनी काम केले. येथील समाजाची जडणघडण आणि विकासात त्यांचे योगदान राहिले आहे, आता हे योगदान मिळणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून या व्यक्तिमत्वाचा कधीही विसर पडणार नाही असे सांगितले. त्यांच्या जाण्याने माझी वैयकत्कीक हानी तर झालीच आहे, पण लातूर जिल्हयाचीही हानी झाली आहे हे मान्यच करावे लागेल असे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी आपल्या म्हटले आहे.
गणेश देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी आणि देशमुख परिवार सहभागी आहे. मृत्म्यास शांती लाभो आणि इश्वर गणेश देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशी इश्वर चरणी प्रार्थना करून भावपूर्ण आदरांजली अर्पन केली.
-------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.