औशांचा युवा पत्रकार पांचाळ विठ्ठल

 औशांचा युवा पत्रकार पांचाळ विठ्ठल





औसा तालुक्यातील गुळखेडा या छोट्या खेडेगावातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले... मराठवाडा व राज्य स्तरीय उत्कृष्ट वार्तांकन पत्रकारिता पुरस्कार प्राप्त करणारे तालुक्यातील पत्रकार विठ्ठल बालाजी पांचाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

यपत्रकार माध्यमांचं काम माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणं असतं असं सांगितलं जातं. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असंही सांगितलं जातं. माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं, असंही सांगितलं जातं.


पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. या सर्वात तंतोतंत पणे उतरून अल्पावधीतच लोकप्रिय होत आपल्या लेखनीच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या समस्या अतिशय परखडपणे मांडण्यांची एक आगळीवेगळी शैली असणारे पत्रकार म्हणून पांचाळ विठ्ठल यांना ओळखले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातून गुळखेडा सारख्या लहानशा गावात जन्म घेऊनही भल्या भल्यासाठी स्वप्नवत असणाऱ्या अनेक पायऱ्या लीलया पार पाडत अवघ्या 7 वर्षात यशाचे शिखर गाठणारे माझे लहान बंधू म्हणजेच विठ्ठल पांचाळ.....

    आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे  प्रश्न प्रभावीपणे मांडणारे,अन्यायाला वाचा फोडणारे , तालुक्यातील अनेकांना उभ्या हयातीत जमले नाही ते कमी वयात आपल्या कर्तृत्वाचा जोरावर करून दाखवणारे निस्वार्थी

प्रेमळ, मितभाषी,आपल्या कामाशी काम ठेवत वागणारे व विनाकारण कोणाचीही हुजरेगिरी करून दिखावा न करणारे अशी ओळख निर्माण करणारा ग्रामीण भागातील समस्या ची जाण ठेवून तळागाळातील समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारे व्यक्तीमत्व म्हणजे पांचाळ विठ्ठल होय. अवघ्या 5-6वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व माहिती पुर्ण लिखाण करीत चुकीच्या विरोधात ठामपणे आपल्या लेखणीतून मते मांडून अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडतात. त्यांनी सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या लेखनातून व्यवस्थित रित्या ग्राऊंड लेवल चे विषय लावून धरण्यात त्यांचा हातखंडा कोणी घेऊ शकत नाही.अशा माझ्या मानलेल्या लहान भावाला परत एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद 



जयपाल ठाकूर

पुढारी तालुका प्रतिनिधी






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या