युवासेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या विचारांची मशाल रॅली
निलंगा ( प्रतिनिधी) :-बदलत्या काळात शस्त्र ही बदलतात आजच्या युगात चिन्ह गोठवून ठाकरे यांना रोखता येणार नाही. हे पन्नास खोके घेऊन आपला इमान आणि सेनेचा विचार गहाण ठेवलेले शिंदे गटाला आज समजणार नाही.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने संबंध महाराष्ट्रात शिवससैनिकांत रुजवलेली मशाल हे भडकत जाणारी असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी आणि महाराष्ट्रातील करोडो कट्टर शिवसैनिकांची ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून येणाऱ्या काळात सेनेच्या मशाली चा चटका शिंदे फडणवीस यांना बसल्याशिवाय राहणार नाही. असा खोचक टोला युवा सेनेच्या जिल्हा समन्यवक दत्ता मोहळकर यांनी निलंग्यात युवा सेनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या भव्य मशाल रॅलीत दिला.सदरील मशाल रॅली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत काढण्यात आली होती. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरी सगरे,मा. तालुका प्रमुख ईश्वर पाटील,पृथ्वीराज निंबाळकर, महिला शिवसेना तालुका प्रमुख रेखाताई पुजारी, राणा आर्य, भरत चव्हाण, अमोल सूर्यवंशी, अभय चौधरी, रवी मोहळकर,नाना उसनाळे, तेजस मंदाडे, गजा ब्रह्मपुरे, अनुपम्प टोंपे, सचिन रजनाळे,नवनाथ सुर्यवंशी, आदी शिवसैनिक उपस्थित होते..
शिंदे फडणवीस सरकारने केंद्रातून हुजरेगिरी करून जरी बाळासाहेबांचा विचार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करून पक्षाचा चिन्ह गोठवण्याचा षड्यंत्र करत असाल तर याद राखा पन्नास खोके एकदम ओके वाल्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवू असा खुला आवाहन देत युवा सेनेने शिंदे फडणवीस सरकारला दिला. जेवढं डवचायचं प्रयत्न कराल तेवढी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता वाढत जाईल तुम्ही चिन्ह जरी गोठवत असले तरी शिवसेनेचा विचार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.असा सल्ला शिवसेनेचे जिल्हा समन्यवक दत्ता मोहळकर यांनी मशाल रॅलीच्या निमित्ताने शिंदे फडणवीस सरकारला दिला...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.