माळी समाजाचा वधू वर मेळावा उत्साहात संपन्न
औसा प्रतिनिधी-दि.११ डिसें रोजी ,ऐरोली ,नवी मुंबई येथे,श्री संत सावता माळी मंडळाचा ३२ वा वधू वर परिचय मेळावा अलोट गर्दीत संपन्न झाला,,,
ठाणे, मुंबई ,नवी मुंबई ,पुणे, जुन्नर औरंगाबाद नाशिक ,सातारा , जळगाव, बीड जिल्ह्यातील एकूण १९२ इच्छुक वधू वरांनी,नोंदणी करून पालकांसह,अंदाजे एक हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली..
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून.किसन फुलमाळी, मंडळाचे माजी अध्यक्ष संजीव फुलमाळी,बबन जगझाप,मनोहर गायकवाड , कुदळे सर.सातव सर मंडळाचे वधू वर संचालक, संपत जाधव सर, पुणे जिल्हा मंडळाचे सचिव व जेष्ठ समाजसेवक रविंद्र औटी सर उपस्थित होते..
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर,कार्यकारिणीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
,मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सूर्यकांत थोरात ,त्यांच्या प्रास्तविकपर भाषणात उपस्थित, इच्छुक वधुवर,व पालकांना,आपल्या अनुभवसंपन्न,वैचारिक,अतिशय सूक्ष्म,मार्मिक,व प्रभावी मार्गदर्शन केले,,,तडजोड हा विवाह,संस्काराचा प्रमुख कणा ,आहे,पत्रिका,व 36 गुण जुळविण्यापेक्षा दोघांची मनं जुळणं अधिक महत्त्वाचे असल्याचे ,त्यांनी सांगितले सचिव रोहित भुजबळ यांनी व ज्ञानेश्वर कोल्हे,सौ शिंदे..शशिकांत थोरात,सुजाता भुजबळ
शीतल व रामदास खेडकर,शैलेश यांनी सूत्रसंचालन केले.श्रमजीवी महिला मंडळाचे सर्व कार्यकर्त्या सौ.मंगलाताई नाईक , सौ.मालिनी वाणी ,सौ.हेमलता थोरात ,सौ.अलका हरिश्चंद्र भुजबळ ,सौ.विमल डोके ,सौ.प्रभावती उमाळे ,
सौ .शोभा जगझाप ताई,.सोमनाथ वाणी ,राजेंद्र फुलसुंदर ,.सुरेश साबळे
मंडळाचे खजिनदार गोपीचंद साबळे,.कृष्णा देवराम तांबे, मारुती बनकर,विलास देवराम अभंग.हरिचंद्र भुजबळ, शंकर विष्णू डोके,शंकर महादेव डोके ,केतन केटरिंग मयूर चव्हाण ,ध्वनी संयोजक,साबळे,व आलेल्या वधू-वरांचे नवीन फॉर्म भरून घेण्यासाठी ,सोपान भुजबळ कु. भाग्यश्री थोरात,अनिरुद्ध उमाळे कु.पवन कुमार फुलसुंदर, कु .चव्हाण,दत्तात्रय मंडलिक,रामदास खेडकर यांचे सुंदर असे नियोजन त्यांनी पार पाडले...
सचिव रोहित भुजबळ यांनी सर्व उपास्थितांचे आभार मानले..
एकूणच नव्याने संपूर्ण हॉल चे ,वातानुकूलित यंत्रणेसह नुतानीकरण केलेल्या या श्री संत सावता माळी मंडळाच्या अत्याधुनिक ,सुंदर हॉल मध्ये; आजपर्यंतच्या सर्वाधिक वधू वर नोंदणीने,आणि कार्यकर्त्यांच्या सांघिक प्रयत्न व उत्तम नियोजनाने मंडळाचा हा वधू वर मेळावा संस्मरणीय ठरला..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.