वंचित आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा निषेध

 वंचित आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा निषेध 





औसा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका जाहीर सभेमध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था चालविल्या असे अत्यंत अपमानास्पद वक्तव्य करून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षण प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांना पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही.सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत असताना पुणे येथे काही युवकांवर शाई फेक प्रकरणी 11 पोलिसांना दोषी ठरवून 11 पोलिसांना विनाकारण निलंबित केले आहे. या 11 पोलिसांचे निलंबन ताबडतोब रद्द करून त्यांना पूर्ववत कर्तव्यावर रुजू करून घ्यावे व शाई  फेक प्रकरणातील भीमसैनिकाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने लावलेले कलम 307 परत घेण्यात यावे आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार औसा यांच्यामार्फत युवा  वंचित बहुजन आघाडी व महिला वंचित बहुजन  आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर वंचित आघाडीचे  तालुका महासचिव श्रावण कांबळे ,महीला तालुका अध्यक्ष सौ छाया दत्तु खरात तालुका महिला महासचिव रेणुका शिवाजी काळे,औसा शहराध्यक्ष इलियास  चौधरी, युवा तालुका उपाध्यक्ष आदेश (सागर) जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उमकार खरात, भागाबाई कांबळे, सुनीता खरात ,बळीराम बंडगर ,दत्ता खरात ,सिद्धार्थ खरात, धनराज सोनकांबळे यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या