औसा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळणे बाबत. तसेच ऑनलाईन प्रणालीने पिकविमा सर्वे बंद करणे बाबत.मुख्यमंत्री कडे मागणी

 औसा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळणे बाबत. तसेच ऑनलाईन प्रणालीने पिकविमा सर्वे बंद करणे बाबत.मुख्यमंत्री कडे मागणी 





औसा प्रतिनिधी 

सविस्तर वृत असे की, औसा तालुक्यासह जिल्हा व मराठवाड्यात यावर्षी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबिन व इतर पिक हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिक संरक्षीत करण्याबाबत विमा भरलेला होता. व त्यासाठी ऑनलाईन प्रणालीने सर्वे ई पिक पाहणी अॅपद्वारे करण्याबाबत कळविले होते. परंतु सर्वच शेतकन्यांकडे ऑनलाईन प्रणाली नसते किंवा शेतात मोक्यावर इंटरनेट चा अडथळा येतो. त्यामुळे बरेचशे शेतकऱ्यांचे ऑनलाईन पिक पाहणी इ आलेली नाही. त्यामुळे त्यांना कोणताही विमा मिळालेला नाही. तसेच एका शिवारामध्ये अजोबाजूंच्या शेतकऱ्यापैकी एकालाच विकविम्याची रक्कम बँकेमध्ये जमा झालेली आहे. त्याच शिवारातील अनेक शेतकरी पिकविमा भरुन सुध्दा नुकसान भरपाई पासुन वंचित आहेत.


 तरी औसा तालुक्यासह जिल्हा व इतर झालेल्या पिकांच्या नुकसानीस सरसकट पिकविमा मिळवूनद्यावा व ऑनलाईन इ पिक पाहणी प्रणाली यापुढे बंद करण्यात यावी अन्यथा शेतकयांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. अशी 

शेख मुजम्मिल,रुकमोदीन अळंदकर खाजा मियाँ जिलानी बागवान आवेज इनामदार दिलिप काबंळे - इरफान बिरादार लामजना तमीम लोहारे खुद्दबोद्दीन इनामदार आदि ने मुख्यमंत्री ना तहसीलदार द्वारा मागणी केली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या