पळवून घेऊन गेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी.*

*पळवून घेऊन गेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी.*




लातूर रिपोर्टर न्यूज़ 

         याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे जुलै 2022 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमधून एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले बाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा  रजिस्टर क्रमांक 302/22, कलम 363 भादवी.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे हे करीत होते.

            संबंधित तपास अधिकारी यांनी विविध ठिकाणी जाऊन नमूद अल्पवयीन मुलीचा शोध घेतला परंतु नमूद अल्पवयीन मुलगी मिळून येत नव्हती. पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष येथील पथकाला नमूद अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे निर्देश देऊन मार्गदर्शन केले. त्यावरून नमूद गुन्ह्याची माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करून सायबर सेल च्या मदतीने माहिती काढून सदर गुन्ह्यातील मुलगी ही अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शामल देशमुख यांचे नेतृत्वात सदर पथक तात्काळ श्रीरामपूर व शिर्डी येथे पोहोचून नमूद अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन ती मिळून आल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही करिता दिनांक 09/12/2022 रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

             पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर ग्रामीण) श्री.सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय उत्कृष्टपणे गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यांतील अल्पवयीन पीडित मुलीचा शोध घेऊन पोलीस ठाण्याला हजर केले आहे.

              सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सायबर सेलच्या मदतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष चे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार, महिला पोलिस अंमलदार लता गिरी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या