कासिद कॅलेंडर चे प्रकाशन
सोलापूर - गेल्या १५ वर्षा पासून नियमितपणे प्रकाशित होणारे कासिद इस्लामी कॅलेंडर २०२३ चा प्रकाशन शमा उर्दू प्राथमिक शाळेत ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदचे उपाध्यक्ष डॉ. इ. जा. तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली व खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार शेख, भारतीय उर्दू विकास फौंडेशनचे अध्यक्ष सुल्तान अख्तर शेख , शमा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अय्यूब नल्लामंदू यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले
प्रकाशक अय्यूब नल्लामंदू यांनी सर्वांचे स्वागत करून कॅलेंडरविषयी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी अन्वर कमिशनर, डॉ. शकील शेख , विकार शेख यांनी ही आपल्या मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
मजहर अल्लोळी यांनी सर्वांचे सत्कार केले मुन्तजीम अ.कुद्दूस नल्लामंदू यांनी आभार मानले
या वेळी इक्बाल बागबान , कमर अल्लोळी , जाफर बांगी ,अस्लम सय्यद , शाकीर चाँदा , कुदूस पटवेगर, नासर आळदकर, इ. उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.