औसा येथे जिल्हास्तरीय इज्तेमाची यशस्वी तयारी
उद्या पासून दोन दिवसीय इज्तेमा ची सुरुवात
औसा-(स्पेशल रिपोर्ट-अॅड. इक्बाल शेख) : वैश्विक सद्भाव, बंधुता, मानव कल्याण तसेच जागतिक शांतता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी औसा येथे ५ व ६ डिसेंबर रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्तेमाचे हे ठिकाण सलग एक महिना पासून यशस्वीरित्या तयार करण्यात आले आहे. ५० हजार समाजातील व्यक्ती बसू शकतील अशा मंडपात ची व्यवस्था करण्यात आली आहे सामुदायिक दुवा व विवाह सोहळा होणार आहे. औसा येथील औसा-वानवडा-तुंगी रोडवर कोविड प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथमच इज्तेमा जिल्हा स्तरावर औसा येथे होत आहे.
या इज्तेमाला सर्व साथीदार सहकार्य करत आहेत.यामध्ये 25 एकर पेक्षा जास्त जागा, इतर सुविधा आहेत. समाज बांधवांना सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये 150 हॉटेल्स, 6 खाण्यापिण्यासाठी झोन, 1200 वॉशरूम, 200 आंघोळीसाठी बाथरूम, 200 शौचालये बांधण्यात आली आहेत.तसेच दोन दवाखाने, पिण्याचे पाणी तसेच 10 चहाची ठिकाणे तयार आहेत. करण्यात आली आहे.पाण्यासाठी 10 लाख लिटर क्षमतेच्या तीन टाक्या करण्यात आल्या आहेत.
दोन दिवसीय इज्तेमाची सांगता मंगळवारी रात्री दुवाने होणार आहे.रात्री 9 वाजता सामूहिक दुवा होणार आहे.जिल्हा अमीर हाजी अन्सार साब यांनी सांगितले की,इज्तेमात सायंकाळी 5 वाजता सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.त्यानंतर सामुहिक दुवा होईल व इजतेमा चा समारोप होईल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.