*शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे यांचा औसा येथे सत्कार*
औसा येथे शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमाताई अंधारे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उप सभापती मा. संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेता पदी प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच औसा येथे आगमन झाल्यामुळे शिवसेना औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ औसा, व्यापारी असोसिएशन, युवा सेना जिल्हा लातूर, हमाल, शेतकरी या सर्व वर्गातून सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी, महिला जिल्हा संघटक सौ, सुनीता चाळक, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे , तालुकाप्रमुख सतीश शिंदे, खरेदी विक्री संघाचे उप सभापती शेखर चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, शहरप्रमुख सुरेश भुरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अभिजीत जाधव, विधानसभा प्रमुख विशाल क्षिरसागर, तालुकाप्रमुख महेश सगर, विजय पवार, अमोल पाटील, अनिल पाटील, संतोष सूर्यवंशी, विलास लंगर, गणेश जाधव, महेश लंगर, श्रीहरी काळे, नवनाथ लवटे, किशोर भोसले, अप्पा सरवदे, सुरेश मुसळे, युवासेना निलंगा तालुकाप्रमुख अनिल अरेकर, श्रीहरी उतके, संजय पाटील, प्रकाश अंधारे आदी उपस्थित होते,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.