स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते - राम कांबळे

 स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते -

राम कांबळे


स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते -

राम कांबळे





औसा प्रतिनिधी 

चित्रकला निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच खेळाच्या स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि त्यातून विद्यार्थी वर्गामध्ये प्रोत्साहन आणि ऊर्जा प्राप्त होते. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे यांनी केले मोगरगा ता औसा येथील श्री केदारलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सहशिक्षक दिनकर निकम, श्री टोम्पे रुक्‍मीनबाई, ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आत्माराम मिरकले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना राम कांबळे म्हणाले की विद्यार्थी वर्गाने ज्ञानार्जुन करीत असताना विविध क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास त्यांचे आरोग्य आबादित राहते. तसेच विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटी आत्मसात करण्याची सवय लागते यातूनच विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग मिळतो. विद्यार्थी वर्गांनी ज्ञानाची कासदरीत वीज स्पर्धेमध्ये सातत्याने सहभागी होऊन यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी श्री केदारलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचे कार्य सुरू असून या शाळेतून राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाचे चांगले नागरिक व विद्यार्थी घडतील व यशाच्या शिखराकडे जातील अशी शेवटी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या