*मा. श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब ( सहकार महर्षी तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या १००००१ व्या वृक्षाचे रोपण*
ग्रीन लातूर वृक्ष टीम द्वारे लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाचे कार्य मागील १३३२ दिवसापासून अविरत करण्यात येत आहे. सदर टीमचे एक वैशिष्ट्य आहे, या टीम मध्ये एकूण ८२ सदस्य असून, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असा एकही पदाधिकारी नसताना मागील १३३२ दिवसांमध्ये ग्रीन लातूर वृक्ष टीमने १००००० वृक्षाची लागवड केलेली आहे आणि किमान १५०००० हजार वृक्ष जगवण्याचे काम आजही करत आहेत.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या चळवळीचा उद्देश केवळ वृक्ष लागवड आणि संगोपन करून हरित लातूर करणे हाच होता. परंतु टीम मधील देई वेळेस सदस्यांनी हरित लातूरचा उद्देश साध्य करत करत सुंदर आणि स्वच्छ लातूर बनवण्यासाठी टीम मधील प्रत्येक सदस्य आजही प्रचंड मेहनत घेत असताना संपूर्ण लातूरकर पाहत आहेत. जे काही लातूर साठी चांगले करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या टीमचा प्रत्येक सदस्य करताना पाहावयास मिळतो.
लातूर शहरातील रोड डिव्हायडर साफसफाई असेल, स्मशानभूमी साफसफाई असेल, रस्ता अपघातामध्ये मृत झालेल्या जनावरांच्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून त्यास रोडच्या बाजूला करणे अशी सर्व कामे ह्या टीमचे सदस्य करतेवेळी लातूरकर नेहमीच पाहत आहेत. *उद्देश हा स्वच्छ लातूर बस एवढाच*
लातूर शहरात सुंदर करायच्या दृष्टीने या टीमने लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरील शासकीय मालकीच्या जागेवर उदा. गुड्डन फुलाचे पिल्लर्स, शासकीय कंपाउंड वॉल, शासकीय कार्यालय इत्यादींच्या भिंतीवर जाहिराती चिटकवून विद्रूपीकरण केलेले पोस्टर काढून ती सर्व ठिकाणे स्वच्छ करण्याचे काम या टीमने केले आहे, आंबेजोगाई रोड डिव्हायडर मध्ये सूर्यफूल प्रोजेक्ट करून शहरात येणाऱ्या पाहुण्यांचे व लातूरकरांना निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडण्यात या टीमला यश आले आहे. बार्शी रोड ते गंजगोलाई भुयारी मार्गाच्या भिंती सुपारी गुटखा तंबाखू खाऊन संपूर्ण रंगवल्या गेल्या होत्या, त्या भिंतींना पाण्याने स्वच्छ करून त्या ठिकाणी वारली पेंटिंग काढल्याने लातूर शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडलेली आहे. *उद्देश हा सुंदर लातूर बस एवढाच*
यामुळे टीमच्या उद्देशात दुरुस्ती करून *लातूर, स्वच्छ लातूर आणि सुंदर लातूर यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचा प्रत्येक सदस्य आतुर* असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही टीम कार्यरत आहे.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या अविरत 1333 व्या दिवशी म्हणजेच दिनांक २५/०१/२०२३ रोजी मा. श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब, सहकार महर्षी तथा माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आणि प. पु. श्री. विद्यानंद ची सागर महाराज (बाबा), मा. श्री. रविशंकर जाधव, माजी नगरसेवक लातूर, मा. श्री. सुधाकरजी बावकर, पोलीस निरीक्षक लातूर, मा. श्री. कल्याणजी बरमदे अध्यक्ष आय एम ए लातूर, मा. सौ. स्वाती घोरपडे, माजी नगरसेविका लातूर, मा. सौ. श्वेता यादव लोंढे, माजी नगरसेविका लातूर, मा. श्री. शहाजी पाटील साहेब, चेअरमन सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी लातूर यांच्या उपस्थितीत हा १००००१ व्या वृक्षाचे रोपणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी याप्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीमवर सतत प्रेम करणाऱ्या प्रत्येक लातूरकर यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात येते.
*उद्देश फक्त आणि फक्त : * ग्रीन लातूर, स्वच्छ लातूर आणि सुंदर लातूर*
*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.