स्वर्गीय सय्यद मुनीर अली खोजन यांच्या पुण्यतिथी निमित्त वसीम भाई मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
स्वर्गीय सय्यद मुनीर अली खोजन यांच्या पुण्यतिथी निमित्त वसीम भाई मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
बी जी शेख.
औसा: दि.27 - शहरातील आझाद चौकात प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी स्वर्गीय सय्यद मुनीर आली यांच्या पुण्यतिथीनिमित्त 27 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या रक्तदान शिबिराला यशस्वी केले.
या शिबीरास मौलाना अमजद जिल्हा कॉग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, शहर अध्यक्ष कॉग्रेस शकीलभाई शेख, पाशाभाई शेख,आदमखॉन पठाण, नसिरभाई कुरेशी,युवा नेते इंजीनिअर अजहरउल्ला हाशमी, अॅड मजहर शेख, इम्रान सय्यद,हाजी शेख,खुनमीर मुल्ला आदी उपस्थीत होते. वसिमभाई खोजन, यांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.