शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ औसा भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी ..
औसा - मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व मित्र पक्ष युतीचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटिल यांच्या प्रचारार्थ आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा विधानसभा मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू असून या भेटीगाठीत पदाधिकाऱ्यांकडून प्रा किरण पाटिल यांना पहििल्या पसंतीचे मत देऊन विजयीी करण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचार नियोजनाची बैठक घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी कामाला लागावे आशा सूचना दिल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रचारार्थ गाठीभेटी घेत पक्षाची भूमिका मांडली जात आहे. याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रात व राज्यात सरकार असलेल्या भाजप व मित्र पक्षांकडून कोणते सहकार्य केले जाऊ शकते या संदर्भात या प्रचारातून सांगितले जात आहे. ही निवडणूक येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रा.किरण पाटील यांच्या विजयासाठी नियोजनबद्ध परिश्रम घेतले जात आहेत. या निवडणुकीत इतर पक्षातील अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने ऊर्जा, ताकद आणि वेगळं चैतन्य निर्माण झाले आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असल्याने न्याय मिळेल या आशेने सरकार सोबत राहण्याची भूमिका शिक्षक मतदारांची आहे.
एकंदरीत आमदार अभिमन्यू पवार यांच्या सूचनेनुसार औसा विधानसभा मतदारसंघातील औसा तालुका व कासारसिरसी मंडळातील पदाधिकारी प्रचारार्थ शिक्षकांच्या भेटीगाठी घेऊन प्रा. किरण पाटिल यांच्या विजयासाठी आवाहन करीत आहेत.
...... फोटो.....
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.