वारकरी मंडळाच्या एरंडी शाखेचे उद्घाटन संपन्न
औसा प्रतिनिधी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर जिल्हा अध्यक्ष ह भ प लालासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जोरदार संघटन सुरू असून रविवार दिनांक 8 जानेवारी तालुक्यातील सेलु. एरंडी आणि सारोळा येथील शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. वारकरी मडळाचे औसा तालुका अध्यक्ष ह भ प खंडू महाराज भादेकर यांच्या शुभहस्ते नाम फलकाचा अनावरण सोहळा संपन्न झाला. एरंडी शाखेच्या अध्यक्षपदी सौ सुनीता सुरेश जाधव पाटील यांची नियुक्ती करून मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष गोविंद तावसे जयनगर, सह अध्यक्ष दिनकर निकम ,सचिव दगडूपंनथ जोशी तळणीकर, संपर्कप्रमुख गोरोबा कुरे ,कोषाध्यक्ष सतीश जाधव, दिलीप रुबदे ,सिद्रामाप्पा राचटे, शंकरराव जाधव, आत्माराम मिरकले ,यांच्यासह मंडळाचे अनेक मान्यवर व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर लांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी एरंडी गावातील अनेक वारकरी व महिला भजनी मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.