पुरस्कारा मुळे मनोबल,धैर्य वाढते डॉ.राजेंद्र माने
सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न.
म.मुस्लिम कबीर "उर्दू पत्रकारितेचे वारसदार" पुरस्काराने सम्मानित.
सोलापूर - सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२३ ला आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान कार्यक्रम व माजी जिल्हा माहिती अधिकारी तसेच उर्दू पत्रकारितेला दोनशेवर्ष पूर्ण झाल्या बदल उर्दू वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीचा सन्मान कार्यक्रम अध्यक्ष अशोक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने,जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर,डॉ.प्रा.नरेद्र कार्टीकर,सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांच्या प्रमुख उपस्थित कै.रंगा अण्णा वैद्य सभागृह मध्ये मोठ्या थाटाने संपन्न झाला.६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्र्य वामनराव जोशी,यु.आ.सिद्दीकी,प्रमोद गवळी,अंबादास म्याकल आणि उर्दू पत्रकारितेला दोनशे वर्ष झाल्याने
ज्येष्ठ पत्रकार,लेखकअजहर फाजील,म.मुस्लीम कबीर,नदीम मिर्जा,अर्शद सिदीकी,सुलतान अखतर ,इक्बाल बागबान,गुलाम साकीब,आसीफ जुनैदी यांचा "उर्दू पत्रकारितेचे वारसदार " म्हणून विशेष सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोठ्या थाटाने संपन्न झाला.या वेळी पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन करत म्हणाले की "कोणत्याही क्षेत्रात कतृत्व सिद्ध करणार्या व्यक्तीसाठी एखादा पुरस्कार फक्त हा त्याचा सन्मान नसतो तर त्याचा धैर्य व मनोबल वाढवणारा प्रसंग असतो,पुरस्कारा मुळे धैर्य व मनोबल तर वाढतेच आणि जीवनाला प्रेरणा मिळते" असे मत व्यक्त केले.या वेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकरनी सुद्धा सर्व पत्रकाराना पत्रकार दिना निमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.स्वागत व पुरस्कार प्राप्त मान्यवराचा परिचय निवड समितीचे अय्यूब नल्लामंदू यांनी करून देताना म्हणाले कि - "मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर उर्दू पत्रकाराचा सन्मान म्हणजे दोन भाषिकांना व दोन मनांना जोडण्याचा प्रशंसनीय कार्य होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सचिव प्रा.पी.पी.कुलकर्णी यांनी केले तर आभार सुभाष सुराणा यांनी मानले.या वेळी दत्ता अण्णा सुरवसे ' डॉ.वळसंगकर,रवीद्र नाशिकर ,पत्रकार अविनाश कुलकर्णी,मजहर अल्लोळी , जाफर बांगी,सतीश कुलकर्णी , प्रकाश संगा,धनंजय कुलकर्णी , भगवान परळीकर,सुरेश फलमारी, एम.एन.पटेल,विश्वनाथ व्हनकोरे,शौकत काजी,ज्ञानेश्वर कुलकर्णी,राजकुमार शहा,मजहर पटेल, ऍड.इकबाल शेख,हुसैन पटेल, राहिल चौधरी,नाजम सय्यद,तौफिक कुरेशी,अतन कबीर उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.