प्रधानमंत्री ग्रामसडक योजना – 3 अंतर्गत औसा व निलंगा तालुक्यासाठी 12.5 किमी लांबीसाठी 12.90 कोटी मंजूर - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश


प्रधानमंत्री ग्रामसडक योजना – 3 अंतर्गत औसा व निलंगा तालुक्यासाठी 12.5 किमी लांबीसाठी 12.90 कोटी मंजूर - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश





दि. 13 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान शून्य प्रहरच्या माध्यमातून बोलताना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा व निलंगा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना – 3 या संदर्भामध्ये मतदार संघातील एकुण मंजूर असणाऱ्या रस्त्यांची लांबी व प्रत्यक्षात झालेली कामे यांची सरासरी टक्केवारी 2.54 इतकी नगन्य असल्याचे तसेच दि. 21/12/2022 रोजी मा. श्रीमती साध्वी निरंजन ज्योतीजी, ग्रामविकास राज्यमंत्री भारत सरकार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये औसा व निलंगा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची वास्तव परिस्थिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिली तसेच सदर रस्ते हे जड वाहतुकीमुळे लवकर खराब होत असून या योजनेंतर्गत होणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर (अंदाजपत्रक) बनवत असताना जड वाहणांची वाहतुक ग्राह्य धरुन डीपीआर (अंदाजपत्रक) बनविण्याबाबत विनंती केली होती तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याकरीता प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश येवून औसा तालुक्यातील रामा 242 ते आलमला उंबडगा ते रा म मा 361 लांबी – 5.50 किमी किंमत – 410.09 लक्ष तसेच निलंगा तालुक्यातील रामा 240 कासार शिरशी कोराळी वाडी कोराळी ते राज्य सरहद्द (घोटाळा) लांबी  - 7.00 किमी किंमत 879.95 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या