द वर्ल्ड स्कूल इंडिया, औसा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे*

 *द वर्ल्ड स्कूल इंडिया, औसा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे*




*औसा, दि. 26 /02/ 2023) "द वर्ड स्कूल इंडीया," औसा येथे दि. 26 फेब्रु 2023 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सरस्वती पूजन व दिप- प्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना., मा . श्री. ज्ञानदेव सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक औसा., मा. प्रा.प्रकाश देशमुख, संचालक, शिव छत्रपती शिक्षण संस्था, लातूर., मा. श्री संजय सगरे, पत्रकार, दैनिक एकमत .,मा. प्रा. अशोक मोटे, सिनेट सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड., मा.प्राचार्य श्री.संजय थोंटे सर, चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर.,मा. श्री संदिपान जाधव, उद्योजक औसा.,प्रा.घोळवे सर, मा. प्रा प्रतापराव भोसले सर, प्रा.संभाजी भोसले, प्रा. सौ ज्योती गणेश पाटील-भोसले, संस्थेचे मार्गदर्शक श्री गणेश पाटील उपस्थित होते. दिप-प्रज्वलना नंतर विज्ञान प्रदर्शन ,दांडिया नृत्य, हस्ताक्षर,निबंध, वक्तृत्व, आनंदनगरी,फन- फेअर इ. विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धांमधे सहभागी झालेल्या महिला पालक यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

          संस्थेचे मार्गदर्शक स्वर्गीय हणमंतराव भोसले (वकील साहेब) यांच्या स्मरणार्थ चालू वर्षापासून नर्सरी ते पाचवी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. मोटे सर यांनी द वर्ल्ड स्कूलच्या यशामध्ये जागृत पालक व ज्ञानदान करणारे शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री सानप साहेब यांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण केवळ मोठमोठ्या ईमारतीमध्ये असणाऱ्या शाळांमधून मिळते असे नाही तर द वर्ल्ड स्कूल सारख्या छोट्या शाळेमधून, वर्षभर नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या, शिक्षणासोबतच संस्कार देणाऱ्या,प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणाऱ्या शाळेमधून मिळत आहे ,त्यामुळे येथे शिकणाऱ्या मुलाचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे असे मत व्यक्त केले. 

त्यानंतर श्री सगरे सर यांनी द वर्ड स्कूल ही संस्था समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये उत्तम शिक्षण देत असून औसा शहरामध्ये नावारूपाला आलेली शिक्षण संस्था आहे असे मत व्यक्त केले. प्राचार्य थोंटे सर यांनी द वर्ल्ड स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही सहभाग पाहून पालक व शाळा यांचा उत्तम समन्वय असल्याने समाधान व्यक्त केले.

त्यानंर मा.प्रकाश देशमुख सर यांनी द वर्ल्ड स्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते, त्यामुळे या शाळेमध्ये निश्चितच उत्तम विद्यार्थी घडतील अशी आशा व्यक्त केली तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचा कल पाहून त्याला त्याचे करिअर निवडू द्यावे असे मत व्यक्त केले.

    वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कोळी गीते ,भारुड, गोंधळ, पंजाबी गीते, कव्वाली, लावणी, बेटी बचाओ बेटी पढाओ नाटीका, राष्ट्रीय एकात्मता यावर अतिशय मनमोहक नृत्य अविष्काराचे सादरीकरण करून उपस्थित पालकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री.राहुल जाधव, शिक्षिका सौ चव्हाण, सौ साळुंखे, सौ शिंदे ,सौ.कलमे, कु.पिंपळे,कु. शिंदे ,सौ. कु. पारुडकर, कु. लोहारेकर ,सौ.हासुबे, श्री विजय हासुबे व श्री शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चव्हाण मॅडम, व कु. पिंपळे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य राहुल जाधव सर यांनी केले.

 कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या