स्टेटस कॉम्प्युटर्सचे संचालक संजय स्वामी यांची एमएस-सीआयटी साठी मास्टर ट्रेनर पदी निवड

 *स्टेटस कॉम्प्युटर्सचे संचालक संजय स्वामी यांची एमएस-सीआयटी साठी मास्टर ट्रेनर पदी निवड*






लातूर (प्रतिनिधी) : एमएस-सीआयटी कोर्स चालविणाऱ्या अधिकृत अध्ययन केंद्रात कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना एमएस-सीआयटी कोर्स मधील नव्याने झालेले बदल, आय टी अवेअरनेस आणि जॉब रेडीनेस अशा दोन प्रकारात उपलब्ध असलेल्या एमएस-सीआयटी कोर्समधील फरक, त्यातील बारकावे, मोबाईल आणि कम्प्युटरवर शिकण्याची विविध स्किल्स, एमएस-सीआयटी पुस्तकातील अभ्यासपूर्ण माहिती, MKCL ने विकसित केलेली आणि अनेक वर्षांपासून वापरात आणलेली सातत्यपूर्ण परीक्षापद्धती, विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एमएस-सीआयटी कोर्समध्ये शिकविण्यासाठी उपलब्ध असलेली स्किल्स अशा विविध विषयांवरील अद्ययावत माहिती देणे, त्यांचे समुपदेशन करणे, आपले शिकवणे अधिकाधिक विद्यार्थीकेंद्रित करणे यासाठी स्टेटस कॉम्प्युटर्सचे संचालक संजय स्वामी यांची लातूर जिल्ह्याच्या मास्टर ट्रेनर पदी  निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संजय स्वामी यांना एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक वीणा कामथ यांच्याकडून देण्यात आले आहे. 


संजय स्वामी यांनी मागील २५ वर्षांपासून स्टेटस कॉम्प्युटर्स या MKCL च्या अधिकृत अध्ययन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, शासकीय आणि खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संगणक साक्षर करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. संजय स्वामी यांचा अनुभव, योगदान आणि शिकवण्याचे कौशल्य विचारात घेवून एमकेसीएलकडून संजय स्वामी यांना मास्टर ट्रेनरचे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे. 


संजय स्वामी यांच्या मास्टर ट्रेनर पदी झालेल्या निवडीबद्दल MKCL चे मराठवाडा पूर्व आणि सोलापूर विभागाचे विभागीय समन्वयक श्री. महेश पत्रिके, लातूर जिल्ह्याचे समन्वयक श्री. आलोक मालू, उस्मानाबाद जिल्ह्याचे समन्वयक श्री. धनंजय जेवळीकर, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एमएस-सीआयटी अधिकृत अध्ययन केंद्राचे चालक, प्रशिक्षक आणि केंद्रप्रमुख यांच्यासह मित्रपरिवार व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या