*पोलीस सेवेत अदम्य साहस चा परीचय देणारे पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य चक्र पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.*
याबाबत माहिती अशी की, दिनांक 09/05/2023 रोजी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथील दरबार सभागृहात ‘शौर्य चक्र पुरस्कार’ वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते याप्रसंगी शौर्य चक्र पुरस्कार आणि किर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच अन्य कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.
या कार्यक्रमात भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सुपूत्र सध्या पोलीस अधीक्षक लातूर या पदावर कार्यरत असणारे श्री सोमय मुंडे यांना नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या साहसी कार्यवाहीसाठी ‘शौर्य चक्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करताना अतुलनीय साहस दाखविले होते. या कामगिरीच्या गौरवा प्रित्यर्थ पोलीस दलातील मानाचे शौर्य चक्र पदक प्रदान करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई केली म्हणून हा गौरव करण्यात आला आहे. याआधी 37 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात जी कारवाई केली होती त्याची दखल घेऊन शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलाला "शौर्य चक्र" हा बहुमान मिळाला आहे.
शांतता काळात दिले जाणारे शौर्य चक्र हे तिसरे मोठे पदक आहे. एरवी शौर्य चक्र, किर्ती चक्र आणि अशोक चक्र ही पदके शांतता काळात लष्करातील वीरांना जाहीर केली जातात. पण अपवादात्मक स्थितीत कर्तव्य करताना अतुलनीय साहस दाखविणारे पोलिसांना ही पदके दिली जातात. याआधी 2009 मध्ये मुंबई पोलीस दलाला शौर्य चक्राचा मान मिळाला होता.
गडचिरोली जिल्ह्यातील मार्डीनटोला जंगलात 12 नोव्हेंबर 2021 रोजी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी मोठी कामगिरी केली होती. या चकमकीत एकूण 27 नक्षलवाद्यांना ठार केले होते. मृतांमध्ये मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवाद्यांचा एक प्रमुख नेता पण होता. या कामगिरीची दखल घेऊन आयपीएस अधिकारी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांना शौर्य चक्र पदक प्रदान करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे यांना मिळालेल्या शौर्य चक्र पुरस्काराने लातूर जिल्ह्याच्या इतिहासात व शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांना यापूर्वी सेवेमध्ये अत्कृष्ठ कामगिरी साठी खडतर सेवेसाठी आंतरिक सुरक्षा पदक, विषेश सेवा पदक, पोलीस महासंचालक यांचे पोलीस पदक अशी पदके देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे यांना मिळालेल्या शौर्य चक्र पुरस्कारामुळे विविध स्तरांतून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.