हज यात्रीनीं दिले अजित पवारांनां निवेदन.
शेख बी जी.
औसा.दि.11 औसा तालुक्यात दि.10 रोजी अजित दादांचा दौरा होता. डॉक्टर अफसर शेख यांच्या निवासस्थानी आले असता तालुक्यातील हाज यात्रीनी औरंगाबाद ऐवजी मुंबईहून हजला जाण्याची सोय करावी अशा आशियाचे निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की संपूर्ण देशातून अनेक हाजीयात्री हाजसाठी जात आहेत प्रत्येक हजियात्री करूनां जवळपास तीन लाख खर्च येत आहे. पण औरंगाबादहून जाणाऱ्या हज यात्रेकरूनां तीन लाख 92 हजार रुपये इतका खर्च आहे. प्रत्येक हजियात्रेकरीला जवळपास 90 हजार रुपये अधिकचा खर्च येत आहे हा खर्च वाचावा यासाठी औरंगाबाद ऐवजी मुंबईहून हाजसाठी जाण्याची सोय व्हावी असे पत्र हज कमिटीला द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर औसा शहराचे माजी नगराध्यक्षा डॉ अफसर शेख व औसा येथील हजला जाणाऱ्या यात्रेकरूच्या स्वाक्षऱ्या आहेत. औरंगाबाद ऐवजी मुंबईहून सोय झाल्यास प्रत्येक यात्रेकरूचे 88 हजार रुपये वाचणार असल्याने प्रत्येकाची इच्छा आहे की औरंगाबाद ऐवजी मुंबईहून हज जाण्याची सोय व्हावी.
ही झालेली वाढ खाजगीकरणाचा दुष्परिणाम असल्याचे येथील हजकरूं मध्ये चर्चा आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.