मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 4 आरोपींना मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 3,07,500/- रुपयांचे 32 मोबाईल व एक मोटरसायकल जप्त*..


 *मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 4 आरोपींना मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,  3,07,500/- रुपयांचे 32 मोबाईल व एक मोटरसायकल  जप्त







लातूर रिपोर्टर न्यूज़ 

                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, काही दिवसांपूर्वी  अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत एका मोटार सायकल स्वारास अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे  392, 34 भादवि ( दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे) या कलमाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

               

           पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दिनांक 08/05/2023 रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे 

1) प्रफुल प्रकाश पवार ,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर.


2) आकाश भरत बिराजदार, वय 24 वर्ष, राहणार न्यू भाग्यनगर, लातूर.


3) प्रद्युम्न उर्फ सोन्या सतीश माळी, वय 25 वर्ष, राहणार गातेगाव,


4) शोएब महबूब पाशा शेख, वय 23 वर्ष ,राहणार वाल्मिकी नगर ,लातूर.

               

                    यांना लातूर शहरातील संविधान चौक परिसरात त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटर सायकल वरून तसेच पायी जाणाऱ्या इसमाना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरीने लुटले आहे, असे  कबूल  करून ताब्यातील चोरलेले एकूण 32 मोबाईल गुन्हे करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,07,500/-  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

                    नमूद आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहेत.


                 सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे,जमीर शेख, तुराब पठाण, नितीन कठारे ,नकुल पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या