जागतिक परिचारिका दिनानिमित्त भादा प्राथमिक आरोग्य केंद्र कडून गुणी परिचारकतेचा सन्मान
औसा-तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवार दिं 12 मे 2023 रोजी जगातील पहिल्या नर्स असणाऱ्या फ़्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी ओ पी डी संपल्यानंतर येथे सतत कार्यतत्पर सेवा देणाऱ्या परिचारिकेचा विशेष करून सन्मान करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथे कर्तव्यावर दाखल झाल्यापासून "सेवा परमो धर्म"म्हणजे आपण दिलेली दैनंदिन रुग्णसेवा हीच खरी सेवा आणि धर्म आहे असे समजून काम करणाऱ्या आरोग्य परिचारिका यांचा मुख्यत्वे करून ज्ञानेश्वरी रवी कचरे- लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला.
कारण ग्रामीण भागामध्ये शहरी भागा इतक्या कर्मचाऱ्यांना सेवासुविधा उपलब्ध होत नसतात तरीही येथे कर्तव्यावर दाखल झाल्यापासून ज्ञानेश्वरी कचरे लोखंडे यांनी रात्री अपरात्री कोणत्याही वेळी या रुग्णांलयामध्ये रुग्ण आले असता त्याला तत्पर सेवा कशी मिळेल!हेच धडपड असल्याचे अनेक रुग्णाकडून समजून येते.त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि केलेल्या कर्तव्याची जान ही ठेवणे आवश्यक असल्याने कचरे -लोखंडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी टीम उपस्थित होते.आणि या सर्व कर्मचाऱ्यांचा ही एक मेकाकडून सन्मान करून या जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
यामुळे गुणी कर्मचाऱ्यांना या सन्मानापासून नवीन ऊर्जा नक्कीच मिळेल आणि सेवाभावाने झपाटून चांगल्या पद्धतीने भविष्यात रुग्ण सेवा देतील याबाबत शंका नाही. अशीच परिस्थिती या प्राथमिक आरोग्य केंद्रात निर्माण होईल हेच याप्रसंगी इच्छा भादेकराकडून व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.