व्यंकटराव पनाळे यांच्या प्रयत्नातून व लोकाधिकार संघाच्या माध्यमातून हरंगुळ (बु.) येथे आधारकार्ड अपडेट कॅम्पचा शुभारंभ.
हरंगुळ :- लातूर;- लोकाधिकार संघाच्या माध्यमातून व लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या प्रयत्नातून हरंगुळ (बु) ता जी लातूर येथे आधारकार्ड अपडेट कॅम्पची सुरुवात दिनांक १३ मे २०२३ वार शनिवार रोजी सकाळी करण्यात आली. याचा शुभारंभ हरंगुळ चे ज्येष्ठ नागरिक निवृत्तीराव तिगिले आणि शिवसंत क्लासेसचे संचालक संभाजी गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना हरंगुळ चे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे म्हणाले की हरंगुळच्या जनतेला लातूरला जाऊन आधारकार्ड अपडेट करण्याकरिता खूप अडचणी येत होत्या व त्यामध्ये वेळही फार जात होता. त्यामुळे आधार कार्ड अपडेटचा कॅम्पच लोकाधिकार संघाच्या माध्यमातून हरंगुळ बु येथे घेण्यात येत आहे. वयोवृद्ध व दिव्यांग तसेच बाल व विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे याच करिता हा कॅम्प हरंगुळ येते उपलब्ध करून देण्यात आला आहे. वय वर्ष एक ते पाच पर्यंतच्या बालकांना निशुल्क सुविधा देण्यात येत आहे. तसेच अन्य सर्वांना शासकीय नियमानुसार जे शुल्क आहे तेवढेच शुल्क भरावयाचे आहे.
या आधार कार्ड उद्घाटन कॅम्प कार्यक्रम प्रसंगी संतोष पनाळे, संभाजी गोरे, महादेव गुरमे, सुरेश राचमाळे, हरिपाल मुळे, चांदपाशा शेख, अंगद तिगिले, नागनाथ शिंदे, संतराम गोरे , लक्ष्मीकांत नागिमे, किशोर सुतार, आरबाज आलमले, बबन उडगे, दगडूसाब आलमले, वीरभद्र नकाते, सादिक शेख, श्रीकांत देशमाने, अकबर शेख, मौलासाब सय्यद, वरद बुर्गे, नागनाथ कांबळे, रेखा देशमाने, आशापरी नागिमे, ताहेराबी शेख, सत्यभामा खरोसे, शोभा कारंडे, कुलाबाई कापसे, विजयमाला बोके, वैशाली माळगे, दैवशाला पोटभरे, काशीबाई पनाळे, सुलोचना माळगे, प्रभावती उडगे, गवळणबाई वाघमारे, शांताबाई मजगे, ज्योती कापसे, मासीमबी पठाण, शोभा हेलाले, अलका कापसे, कल्पना हिंगे, कुशाबाई शिंदे, सुरेखा जाधव, सुशीला रोकडे, खैरूनबी सय्यद, वर्षा भालेराव, उमा सुतार, छायाबाई खरोसे, गंगुबाई कोमटवाड, कौशाबाई सगर आदी उपस्थित होते.
आधार कार्ड अपडेट कॅम्प घेऊन सर्वसामान्यांची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल जनमानसातून समाधान व्यक्त करण्यात येत असून लोकाधिकार संघाच्या माध्यमातून होत असलेल्या जनसेवेच्या कार्याबद्दल जनतेतून कौतुक केले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.