हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांना होणार मार्गदर्शन.
लातूर(सा.लातूर रिपोर्टर न्यूज) येथील साई रोडवरील मदरसा दारूल उलुम सिद्दीकिया यांच्या वतीने हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांसाठी लेबर कॉलनी मदनीनगर लातूर येथील हुसेनिया मस्जिद येथे ३० मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत मार्गदर्शन होणार आहे.या शिबिरात हज यात्रा कशी करावी, याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.पहिल्या सत्रात 'हज यात्रेची तयारी' या विषयावर मौलाना मुहंमद इस्माईल कासमी,दुसऱ्या सत्रात उमराहची परिपूर्ण पद्धत या विषयावर मौलाना हाफिज जब्बारसाब मजाहिरी,तिसऱ्या सत्रात हज व जियाराते मुकद्दसा या विषयावर मालेगाव येथील मुफ्ती हसनैन रहमानी,चौथ्या सत्रात हाजरी ए मदीना का तरीका व आदाब या विषयावर मौलाना महंमद इसराईल रशिदी यांचे प्रवचन होईल. सुफा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मौलाना शौकतसाब हे प्रार्थना करणार आहेत. हज यात्रेकरूंनी शिबिरास उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे
मदरसा दारुल उलुम सिद्दीकियाचा पुढाकार
■ हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांना यात्रेदरम्यान,काय काय करावे लागणार आहे.काय अत्यावश्यक आहे,याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
■ मौलाना इस्त्राईल रशिदी यांच्या मदरसा दारुल उलुम सिद्दीकियाच्या पुढाकारातून मार्गदर्शन कार्यक्रम होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.