जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूरच्यावतीने दिव्यांगांना कृत्रिम साहित्य वितरण करून पालकमंत्र्यांचा वाढदिवस साजरा
लातूर, दि. 17 (जिमाका) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांकरिता कृत्रिम साहित्य वाटपाचे आयोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर अंमलबजावणी अभिकर्ता संवेदना प्रकल्प, हरंगूळ (बु) लातूर, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व विलासराव देशमुख शासकिय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीरजी जोशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, केंद्राचे स्थानिक समिती सदस्य प्रा. भगवान देशमुख व बसवराज पैके, परमेश्वरजी सोनवणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, बालासाहेब वाकडे, फिजिओथेरपीस्ट डॉ सौ मुंडे, आत्माराम पळसे, राजनंदणी बनसोडे आणि दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा 55 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात 7 गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना भ्रमण ध्वनी संच (मोबाईल हँडसेट), 1 कर्णबधिर दिव्यांगाला कानाची मशीन, 2 अस्थिव्यंग दिव्यांगांना कुबड्या, 1 दिव्यांग मुलाला चाकाची खुर्ची (व्हील चेअर) चे वितरण करण्यात आल्याचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर यांच्याकडून आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.