वृक्ष प्रेमी नवरदेवाच्या लग्नात मित्रांनी आलेल्या पाहुण्यांना ४०० फुलझाडे वितरीत केली.
औसा
ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सन्माननीय सदस्य विजय मोहिते यांचा विवाह आज संपन्न झाला. या निमित्ताने विजय च्या मित्रांनी विजयला लग्नात एखादी भेटवस्तू देण्यापेक्षा अक्षता साठी आलेल्या पाहुण्यांना झाडे देण्याचे ठरविले. बदलते वातावरण, वाढलेले तापमानवाढ रोखण्यासाठी घरोघरी झाडे असणे महत्वाचे आहे. हा विचार करून अक्षता करिता आलेल्या गावकऱ्यांना शेवगा व बारा महिने फुलं देणाऱ्या मोगरा रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित सर्वानी स्वागत करून कौतूक केले. घरातील परिवारातील समाजातील कुठलेही सुख दुःखाचे प्रसंगानिमित्ताने भेट स्वरूपात झाडे द्यावीत असे आवाहण ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रीन लातूर वृक्ष टीम
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.