लोकप्रहार संघटनेची सरकारला हाक
रमाई घरकुलाचे अनुदान त्वरित लाभार्थी यांना देण्यात यावे :- अजय सुरवसे
*अन्यथा आंदोलन करू
अनेक विषया संदर्भात लोकप्रहार संघटनेचे समाजकल्याण आयुक्त लातूर द्वारे मा मुख्यमंत्री ,पालकमंत्री, समाजकल्याण मंत्री मा खासदार, जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे
लातूर प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे
लातुर शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील रमाई घरकुलाचे अनुदान त्वरित लाभार्थी यांना देंने. घरकुल लाभार्थी यांचे राहिलेले हफ्ते देण्यात तात्काळ द्या.नवीन 1000 घरकुल लाभार्थी यांची यादि लातुर महानगर पालिका यांनी पाठविली आहे. त्या लाभार्थिना अनुदान त्वरीत देण्यात यावे. अडीच लाख रूपये 250000 ऐवजी साडेतीन लाख रुपये350000 अनुदान देण्यात यावे. वाढलेल्या महागाई मुळे अडीच लाख रुपये मध्ये घर बांधकाम होत नाही त्यामुळे मा.मुख्यमंत्री सरकार व मा.समाजकल्याण मंत्री यांनी याकडे जातीने लक्ष घालून वाढीव निधी मंजूर करून देण्यात यावा अन्यथा लोक प्रहार संघटना तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
रमाई घरकुल विषयावर त्वरित शासन स्तरावर पाठपुरावा करून वाढीव निधी मंजूर करून देण्यात यावे आशा विविध मागण्याचे निवेदन देतेवळी लोकप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अजय सुरवसे तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उप संपादक व रोहीत सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष लोक प्रहार संघटना बिपिन शिंदे, शिवा दामा, राहुल आखाडे, जयपाल लोखंडे,सतीश डोंबे,अरुण रणदिवे,राहुल अडसुळे,युवराज गुंजिटे,सचिन इचके, निखिल कोलते, प्रणव पोटभरे, बालाजी जाधव,अभिषेक रसाळ व अन्य पदाधिकारी निवेदन देतेवेळी हजर होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.