सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते मांजरा कारखाना येथे इथेनॉल वाहतूक टँकर व जेसीबी मशीनचे पुजन संपन्न
विलासनगर :-- विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते इथेनॉल वाहतूक टँकर व जेसीबी मशीनचे पुजन संपन्न झाले.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात थेट ऊसाच्या रसापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली जात आहे. अशा वेळी सदरील इथेनॉल डेपो पर्यंत पोहोंचती करण्यासाठीचा विचार करून कारखान्याने स्वतःचे ३५ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर मागच्या वर्षी खरेदी केले होते.चालू वर्षी ४० हजार लिटर क्षमतेचे दोन वाहतूक टँकर व कारखाना अंतर्गत करावयाच्या कामासाठी एक जेसीबी मशीन देखील खरेदी केली आहे. या दोन्हीचे पुजन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.