सोशल महाविद्यालयात सेवकांच्या हस्ते उर्दू पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
सोलापूर- सोशल असोसिएशन कला व वाणिज्य महाविद्यालय मध्ये उर्दू विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद शफी चोबदार लिखित पुस्तक तलखीस चांद आसनाफे नसरचे प्रकाशन महाविद्यालयाचे जेष्ठ सेवक अब्दुल रहीम मणियार आणि साहेबराव क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी हे होते. डॉ. गढवाल यांनी कार्यक्रमांची प्रस्तावना केली आणि पुस्तकाचे विश्लेषण करतना सांगितले की प्रा. डॉ. चोबदार ची ही पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. ही एक चांगली संदर्भ ग्रंथ आहे. पुस्तकाचे उदघाटक अब्दुल रहीम मणियारनी सांगितले की चोबदार सरांनी हे पुस्तक कष्ट करून लिहिलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी याचे लाभ घ्यावे.
प्राध्यापक डॉ चोबदार यांनी आपला मनोगत व्यक्त करताना सांगितले की ते या पुस्तकात समाविष्ट असलेले प्रत्येक प्रकरणावर एज्युकेशनल व्हिडिओ तयार करीत आहेत आणि पुढच्या आवृत्तीमध्ये बारकोड छापण्यात येईल विद्यार्थी ते बारकोड स्कॅन केल्यानंतर त्यांना त्या प्रकरणाचे व्हिडिओ बघता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पुस्तक प्रकाशन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. तांबोळी यांनी सांगितले की डॉ. चोबदार यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी तीस पुस्तकांचे संपादन केले आहे आणि उर्दूचे विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले आहे त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे प्राध्यापक एम.डी. शेख यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. इनामदार यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.