औसा तालुक्यातील श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूल लिंबाळा (दाऊ) विद्यालयाचा 100 % निकाल ...

  औसा तालुक्यातील श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूल लिंबाळा (दाऊ) विद्यालयाचा 100 % निकाल ......







10 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत लिंबाळा (दाऊ), येथील श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत श्री केदारेश्वर शाळेचा निकाल 100 % लागला असुन यात  मनीषा बिराजदार 96%गुण घेऊन प्रथम आली तर राधिका गुंजकर ही विद्यार्थिनी 95.80% गुण  घेऊन दुसरी व साक्षी कोहळे 94.40 %  घेऊन तृतीय आली असुन 

याबरोबरच श्रावणी कुलकर्णी 93.20% नम्रता कुलकर्णी 92.80% मनस्वी सूर्यवंशी 89 % व सृष्टी पाटील 84.60 % घेऊन विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले अहेत ,


लिंबाळा येथील श्री केदारेश्वर शाळेची परंपरा ही गुणवत्ता व शालेय अभ्यासक्रम सुधारणीसाठी सदैव प्रयत्नशील असणारी शाळा म्हणून नावलौकीक असलेली शाळा असुन .या शाळेचे संस्थापक प्रशांत कुलकर्णी व मूख्याध्यापीका शर्मिला देशमुख हे शाळेच्या आभ्यासाचे सुसज्य व्यवस्थापण करुन शाळेची गुणवत्ता कशी वाढवता येते यासाठी सदैव प्रयत्नशिल असतात .केदारेश्वर या शाळेमध्ये  मुलींची सुरक्षा डोळयासमोर ठेउन सी .सी .टी वी कॅमेरा बसवत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत वाटर प्युरीफाय बसवून शाळेला ज्ञानाचे मंदिर बनवन्याचा संस्थाचालक सतत प्रयत्न करतात .या श्री केदारेश्वर शाळेतील मुलींनी बाजी मारत पहिला .दुसरा व तीसरा येण्याचा मान मिळवला आहे यावेळी श्री केदारेश्वर शाळेतील दहावी उत्तीर्ण 

             गुणवंत विद्यार्थिनींचे शाळेचे संस्थापक प्रशांत कुलकर्णी मुख्याध्यापिका शर्मिला देशमुख व संस्था उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांच्यासह शिक्षकांनी दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांचे आभिनंदन करण्यात आले .








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या