औसा फर्टीलायझर्स असोसिएशन अध्यक्षपदी जयराज कारंजे
औसा प्रतिनिधी औसा फर्टीलायझर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कारंजे कृषी सेवा केंद्राचे संचालक जयराज आप्पा महालिंगप्पा कारंजे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन हुरदुळे यांची सर्वानुमते निवड गुरुवार दिनांक 8 जून रोजी आयोजित बैठकीमध्ये करण्यात आली औसा शहरातील फर्टीलायझर्स व्यवसायिकांचे संघटन करून या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना विनम्र व तत्परपणे वेळेत सेवा सुविधा देण्यासाठी ही संघटना कार्यरत असून फर्टीलायझर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे जयराज आप्पा कारंजे यांनी आभार मानले आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून फर्टीलायझर्स असोसिएशनची आगामी काळात कामगिरी करीत राहू असा विश्वास ही त्यांनी यावेळी आयोजित सत्कार प्रसंगी दिला कार्यक्रमासाठी औसा शहरातील फर्टीलायझर्स व्यवसायिक उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.