सुशील सोमनाथ ढोले यांचे वैद्यकीय परीक्षेत उज्वल यश
औसा प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील सुशील सोमनाथ ढोले या विद्यार्थ्याने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षेत उज्वल यश संपादन करून वैद्यकीय परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सुशील ढोले यांचे वडील सोमनाथ ढोले यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. सुशील सोमनाथ ढोले यांनी तळमळीने वैद्यकीय अभ्यासक्रम करून एमबीबीएस ची पदवी संपादन केल्याबद्दल सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश तेलगाव, शिवपुत्र ढोले, सोमनाथ ढोले, बालाजी जकाकुरे, महादेव भातंबरे, कमलाकर जकाकुरे, उत्तम मेहत्रे, शिवाजी जकाकुरे, तानाजी बिराजदार, वैभव म्हेत्रे देविदास म्हेत्रे, भरत म्हेत्रे, भरत कोकरे, चिदानंद जाधव, नारायण इंद्राळे, बालाजी झेरिकुंठे, रामकिशन सुतार इत्यादींनी अभिनंदन करून सुशील सोमनाथ ढोले यास भावी कार्यासाठी शुभकामना दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.