श्री रामनाथ विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा 99 टक्के निकाल

श्री रामनाथ विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा 99 टक्के निकाल





आलमला  - श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला.ता.औसा या विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल 99.00 टक्के इतका लागला असून विद्यालयातून प्रथम कु.मुलानी तनाज मुक्रम 92.60%, द्वितीय कु.लोणारे स्नेहा महादेव 92.20% व तृतीय कु.पांचाळ स्नेहा माधव 91.40 % गुणानुक्रमे या तीन मुली प्रथम,  द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश मिळवल्या आहेत, विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली असून  विशेष प्राविण्यात 25 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 34 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  99 % निकाल विद्यालयाने दिला आहे .या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीं,आंबुलगे रंगनाथ,  श्री धाराशिवे शरण, श्री पंडगे नरसिंग, श्री नलवाडे नितीश, श्री श्याम कोकाटे, सौ.अमरजा उकरडे यांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष ऍड उमाशंकर एस. पाटील ,उपाध्यक्ष श्री शिवाजीराव आंबुलगे ,सचिव श्री प्रभाकर कापसे, सहसचिव श्री नंदकुमार धाराशिवे संस्थेचे विश्वस्त प्रा. जी.एम.धाराशिवे , श्री सोपानकाका अलमलेकर,  श्री मन्मथप्पा धाराशिवे, श्री विरनाथ हुरदळे, श्री शिवसांब हुरदळे, श्री नरेंद्र पाटील ,मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील , पर्यवेक्षक श्री पी. सी.पाटील संस्थेच्या सभासदांनी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव व  ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या