सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार. अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई*


*सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार. अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई*





लातूर रिपोर्टर न्यूज़ 

         याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्या इसमाचे नाव गर्जन उर्फ सिद्धांत उत्तम गायकवाड,राहणार शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर असे आहे.

             त्याच्यावर सन 2009 ते 2021 कालावधीमध्ये मारामारी करणे दुखापत करणे, गैर कायद्याचे मंडळी जमून मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा करणे, दरोडासारखा गंभीर गुन्हा अशा प्रकारची गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती.

                 आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, नमूद सराईत गुन्हेगार याचे कडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये याकरिता शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या  गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. 

            सन 2021 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ चे तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी नमूद आरोपी विरुद्ध हद्दपारचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. 

                यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांना सदर सराईत आरोपी विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे  पाठविण्यात आलेल्या हद्दपारिच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी नमूद सराईत आरोपी विरुद्ध सविस्तर हद्दपारचा प्रस्तावाचा पाठपुरावा करून उपविभागीय दंडाधिकारी निलंगा यांचे कार्यालयात सुनावणीअंति नमूद आरोपीस मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(ब) अन्वये एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

           आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणारे काळात होऊ घातलेल्या निवडणुकांचे अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (ब) प्रमाणे कार्यवाही करून दिनांक 19/05/2023 तारखेपासून सदर सराईत गुन्हेगार लातूर, जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

                  सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार,उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या