अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात सहभागी व्हा

 अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात सहभागी व्हा 






औसा प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने सकाळी 9.30  वाजता अहिल्यादेवी होळकर चौक,धनगर गल्ली  औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण होणार असून याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी  लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख  हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महादेव बनसोडे ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे , गोपाळ धानुरे सामाजिक कार्यकर्ते सदानंद शेटे ,माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, हनुमंत राजटे, माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, चंद्रकांत हजारे, बंडू कोद्रे , प्रणील उटगे ,जगदीश परदेशी ,सुरज उटगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी 6 वाजता औसा शहरातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जयंती समिती औसा व होळकर प्रतिष्ठान औसा यांच्या वतीने करण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या