शांताबाई महाराज यांचे निधन
औसा प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले स्वर्गीय आमदार मल्लिनाथ महाराज यांच्या धर्मपत्नी शांताबाई मल्लिनाथ महाराज यांचे सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षाचे होते. औसा येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्रनाथ महाराज, डॉक्टर वीर नाथ महाराज आणि मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अग्रणी असणारे मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या त्या मातोश्री होत्या. तर औसा येथील नाथ संस्थानचे पाचवे पिठाजी पती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर आणि नाथ संस्थांचे गोरखनाथ महाराज औसेकर यांच्या त्या काकी होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक विवाहित मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीमती शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाराबाई मंदिर नजीक असलेल्या स्मशानभूमी मध्ये औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नात संस्थांचे शिष्य गण नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.