आ. राणाजगजितसिंहजी पाटील व आ. अभिमन्यू पवार यांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मोर्चा संमेलन व टिफिन बैठक.....
मोदी सरकारच्या @९ कार्यकाळातील कामांची दिली माहिती...
औसा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला @९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय संपर्क अभियान अंतर्गत औसा मतदारसंघातील करजगाव येथे (दि. २५) जून रोजी माजीमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त मोर्चा संमेलन व टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दोन्ही आमदारांनी मोदी सरकारच्या ९ वर्षातील काळात झालेल्या कामांची सर्वाना माहिती देत या काळात झालेल्या कामाची माहिती घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी धाराशिव चे अॅड सचिन काळे, भाजपचे औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, बाजार समितीचे सभापती शेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, सुशीलदादा बाजपाई, अॅड अरविंद कुलकर्णी, कंटिअण्णा मुळे, दिगंबर माळी, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, औसा शहरध्यक्ष लहू कांबळे, सुनील उटगे,काकासाहेब मोरे, संदिपान जाधव, युवराज बिराजदार, प्रा सुधीर पोतदार, धनराज परसणे, शिवरूद्र मुरगे, तुराब देशमुख, पप्पूभाई शेख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन आनसरवाडे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयमाल रंधवे, कल्पना ढविले, सोनाली गुळबिले, मोहिनी पाठक, सविता सुर्यवंशी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की मोंदीजीने ९ वर्षात जे प्रचंड काम केले आहे ते प्रत्येक घरापर्यंत, नागरिकांपर्यंत आपणास पोहोचवायचे आहे. यासाठी ज्यांनी जी जबाबदारी पक्षानी दिली आहे. ती पार पाडायची आहे.कोव्हीडच्या काळात सरकारकडून झालेले काम.आम जनतेपर्यंत वेगवेगळ्या लाभाच्या योजनेतून झालेल्या सहकार्य याची माहिती सांगायची आहे. मोदींच्या सरकारच्या कामाबद्दल लोकांच्या मनात भावना जागरुक करण्याची गरज आहे.अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जागतिक योगदिन साजरा झाला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १८० देशाच्या प्रतिनिधी उपस्थित होते.योग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे व्यापक काम पंतप्रधान मोंदीजीने केले. यावेळी वंदेमातरम च्या घोषणा अमेरिकेतील संसदेत दिल्या गेल्या यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की ९ वर्षांत आपली अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर गेली असून लवकरच जागतिक स्तरावर भारत ३ री अर्थव्यवस्था होणार आहे.असे सांगून माजीमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की आपले मोठे भाग्य आहे कि नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान आपणास मिळाले असून त्याच्या माध्यमातून आपली घौडदौड सुरू आहे. त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा आपण पार करित असून १ रूपयात शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे. बसने महिलासाठी प्रवासात ५० टक्के सुट दिली गेली.शासकिय योजनेतून उपचार होत आहे.कोव्हीडच्या काळात देशातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली.आदी कामे घरोघरी पोहचण्याचे काम भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मोदींच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे झाली असून आपल्या सरकार विरोधात विरोधकांना बोलायला मुद्देच नाहीत. या ९ वर्षाच्या काळात संपूर्ण देशात रस्ते विकासाचे जाळे निर्माण झाले असून या माध्यमातून दळणवळणाला चालना मिळाली आहे.कोव्हीडच्या काळात लोकांची उपासमार होऊ नये यासाठी मोदींजीनी धान्याचे भांडार उघडले.देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढत असताना विकास व गरिबांची सेवा हे दुहेरी काम मोदीजीने केले.६० वर्षाच्या काळात मुस्लिम समाजाला वोटबॅक म्हणून काँग्रेसने वापर केला असून नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व समावेशक योजना देशात पारदर्शकपणे राबवून सबका साथ सबका विकास हि संकल्पना राबविली असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज परसणे यांनी केले.
........
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.