*18 व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये लातूर पोलीसांची कामगिरी. लातूर पोलिसांना 4 सुवर्ण व 6 रजतपदक. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे कडून अभिनंदन*
लातूर
पोलीसांची व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता व दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याअनुषंगाने दिनांक 17/07/2023 ते दि. 19/07/2023 या कालावधीत मा. डॉ. शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली 18 वा नांदेड
परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे आयोजन पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक.नांदेड श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक,पोलीस उप अधीक्षक (गृह), यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक कार्यालये, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथील एकुण 60 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या स्पर्धत सहभाग घेतला होता.पुढील श्रेणी ज्यात
1) शास्त्रशुध्द पध्दतीने तपास(फुटप्रिंट कास्टिंग, पुरावे लेबलिंग, पॅकिंग,मोडिको-लिगल),
2) पोलीस छायाचित्रण (फोटेग्राफी),
3) दृकश्राव्य चित्रण (व्हिडीओग्राफी),
4) घातपात विरोधी तपासणी
5) संगणक कौशल्य क्षमता
6) श्वान क्षमता चाचणी
आदी विविध विषयावर स्पर्धकांना सामोरे जावे लागते. त्याबरोबर लेखी व तोंडी परीक्षे बरोबरच प्रात्याक्षित परिक्षा ही घेण्यात येवुन वस्तुनिष्ठ मुल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परिक्षण करण्यात येते. त्याच प्रमाणे स्पर्धाकांचे गुन्हे तपासाचे कौशल्य तपासण्यासाठी त्यांना डमी गुन्हयाचे टास्क देण्यात आले ज्यात त्यांना कमीत कमी वेळेत अत्यंत कौशल्य पुर्ण तपास करण्यासाठी स्पर्धकांनी स्वत:चे कसब लावले.
खालील पोलिस अधिकारी/अमलदारांना विविध स्पर्धेमध्ये मिळालेले पदके खालील प्रमाणे.
1) फिंगरप्रिंट टेस्ट-सपोनी विशाल शहाणे-
सुवर्णपदक
2) लेबलिंग व पॅकिंग टेस्ट-सपोनी विशाल शहाणे- रजतपदक
3)न्यायवैदकशास्त्र- सपोनी विशाल शहाणे- सुवर्णपदक
4)फोटोग्राफी टेस्ट- सपोनी विशाल शहाणे- सुवर्णपदक
5)फोटोग्राफी स्पर्धा- सुहास जाधव- सुवर्णपदक
6)पोलीस व्हिडिओग्राफी- सुहास जाधव- रजतपदक
7)घातपात विरोधी तपासणी- रियाज सौदागर- रजतपदक
8)घातपात विरोधी तपासणी- बक्तार शेख- रजतपदक
9)घातपात विरोधी तपासणी-सुधीर सुडके-रजतपदक
10)ऑब्झर्वेशन टेस्ट- कैलास चौधरी- सुवर्णपदक
याप्रमाणे पोलीस अधिकारी व अमलदारांनी पदके मिळवली आहेत. संघाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी केले असून घातपात विरोधी तपासणी संदर्भात पोउपनि कोमवाड यांनी परिश्रम घेतले. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मा. डॉ. शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांचे शुभ हस्ते सर्व विजेत्यांना पदक व प्रशंसापत्र देवुन गौरवण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आधुनिकरणाची कास धरून नविन तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, किचकट व जटील स्वरूपाचे गुन्हयाची उकल करतांना नविन तंत्रज्ञानाचा वापर करून ते लवकरात लवकर उघड होण्यास मदत होते. त्यामुळे व्यक्तीने कायम शिक्षण आत्मसात करण्याची प्रक्रिया चालु ठेवावी शिक्षण घेतांना वयाचे कोणतेही बंधन नसते. यामुळे स्वत:ला वेळोवेळी अपग्रेड करत राहणे अत्यावश्यक आहे. असे म्हणुन सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच राज्यस्तरावरिल कर्तव्य मेळाव्यात सुध्दा उत्तम कामगिरी करत पदक प्राप्त करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.