विनयभंगाच्या गुन्हात 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासारशिरशी ची कारवाई*

    विनयभंगाच्या गुन्हात 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासारशिरशी ची कारवाई*    



लातूर रिपोर्टऱ 
            महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कडक धोरण अवलंबले असून विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीवर 24 तासांच्या आत कोर्टात आरोपपत्र दाखल.
              याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 06/07/2023 रोजी कासारशिरसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्ह्यातील दोन आरोपींनी 23 वर्षीय फिर्यादी महिलेशी जवळीक साधत विनयभंग  केला व  तिचे नवऱ्यास अश्लील शिवीगाळ केली म्हणून कासारशिरसी पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 354, 354 अ, 354 ड, 504, 294, 114 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी कासारशिरशी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रियाज शेख यांना सदर गुन्ह्यांमध्ये 24 तासाच्याआत तपास करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल करण्यासाठी आदेशित केले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्यांचे तपासात सपोनि रियाज शेख व पोलीस अंमलदार गोरख घोरपडे यांनी 24 तासात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. 
                 आरोपींना तातडीने शिक्षा होण्याबरोबरच, गुन्हेसिद्धीचे प्रमाणही वाढावे, या मागचा उद्देश असून महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी कायदे कठोर करण्यात आले आहे.विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने आरोप निश्चित करून कोर्टात उभे केल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे शक्य होते. यामुळे महिलांच्या मनात विश्वास निर्माण होईल व गुन्हेगारांनाही चाप बसेल.महिला अत्याचार करणाऱ्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या विरुद्ध तातडीने आणि जलद गतीने तपास करून माननीय न्यायालयांमध्ये सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्यात येइल आणि आणि कडक प्रतिबंधक कारवाई अशा इसमाविरुद्ध करण्यात येत आहे.
                   सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात सपोनि श्री. रियाज शेख, पोलीस अमलदार  गोरख घोरपडे, वरवटे,  बळीराम मस्के यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या