१ जुलै* *राष्ट्रीय डॉक्टर दिन* पण कशा साठी

 ⭕

*१ जुलै*

*राष्ट्रीय डॉक्टर दिन* पण

 कशा साठी 






डॉक्टरला देवा सारखं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असतो. त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळालेले आहे. 


भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. पण यामागील नेमकं कारण तुम्हांला ठाऊक आहे का?


भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ बिधान चंद्र रॉय BC Roy यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. 1991साली भारतामध्ये डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी 1961 साली डॉ विधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच 'भारतरत्न' बहाल करण्यात आला आहे. 



⭕डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 साली बिहारमधील पटना येथे झाला. फिजिशियन डॉ विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात. 


⭕डॉ रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली. 


⭕रूग्णांच्या सेवेसाठी 24X7 कार्यरत असणार्‍या डॉक्टर्सना यादिवशी धन्यवाद दिले जातात. त्यांच्या सेवेप्रती या दिवशी आदर आणि आभार व्यक्त केले जाते.


*डॉ जिलानी पटेल*

लाईफलाइन होमिओ क्लिनीक, औसा

हो - 9970737297

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या