घरफोडीतील सराईत आरोपींकडून, चोरीस गेलेले इलेक्ट्रिकल साहित्यासह 1 लाख 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 1 आरोपी अटक. पोलीस ठाणे विवेकानंद ची कामगिरी.*

*घरफोडीतील सराईत आरोपींकडून, चोरीस गेलेले इलेक्ट्रिकल साहित्यासह 1 लाख 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 1 आरोपी अटक. पोलीस ठाणे विवेकानंद ची कामगिरी.*





लातूर रिपोर्टर 

              याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 22 जून ते 23 जून च्या मध्यरात्री  पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील गरुड चौक परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानाचे गोडाऊन फोडून  अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून गोडाऊन मधील 1 लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल साहित्य चोरून नेले तक्रारीवरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुरनं  390/2023 कलम 454,457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

              सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे  पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना  देण्यात आले होते.

          तपासा  दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून आरोपी नामे


 1) प्रशांत अशोक गाडेकर वय 33 वर्ष राहणार भादा तालुका औसा सध्या राहणार गरुड चौक लातूर


             यांना दिनांक 30 जून 2023 रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता, त्यांने त्याचा आणखीन एक साथीदाराच्या मदतीने इलेक्ट्रिकल साहित्याची दुकानांमध्ये चोरी करून इलेक्ट्रिकल साहित्य चोरल्याचे कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विविध इलेक्ट्रिकल साहित्य व लोखंडी केबल असा एकूण एक लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे लपून ठेवलेले साहित्य काढून दिल्याने  ते जप्त करण्यात आले आहे.

                  गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, मदतनीस पोलीस अमलदार वाजिद चिखले हे करीत असून गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

           नमूद आरोपी प्रशांत गाडेकर हा अतिशय सराईत गुन्हेगार असून याआधी त्याच्यावर लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे भादा, मुरुड, रेनापुर, औसा, एमआयडीसी, लातूर ग्रामीण, गातेगाव, गांधी चौक, येथे चोरीचे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत.

                सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अमलदार वाजीद चिखले, कोकणे, बेरळीकर , रमेश नामदास यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला इलेक्ट्रिकल साहित्याचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या