समग्र महात्मा बसवेश्वर ग्रंथाचे हैद्राबाद येथे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांच्या हस्ते प्रकाशन
लातूर ः बाराव्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्रावर व वचनांवर आधारित असलेला समग्र महात्मा बसवेश्वर या ग्रंथाचे प्रकाशन 13 जुलै 2023 रोजी हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी झाले. यावेळी समग्र महात्मा बसवेश्वर या ग्रंथाचे लेखक तथा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांना दिली. या प्रकाशन समारंभाप्रसंगी तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद अली, खा.बी.बी.पाटील, शंकरअण्णा धोेंडगे, अॅड.मल्लिकार्जुन करडखेलकर, नागनाथअप्पा भुरके तसेच हैद्राबाद व लातूर येथील अनेक समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते. तेलंगणा राज्यात समग्र महात्मा बसवेश्वर या ग्रंथाचा वितरण शुभारंभही याच दिवशी खा.बी.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा.सुदर्शनराव बिरादार म्हणाले हैद्राबाद व महाराष्ट्रालगत असलेल्या जिल्ह्यातील हजारो समाजबांधवांना या ग्रंथाचे वितरण आजपासून सुरू करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.