स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी*5 जनांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर
स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 07 व 08 ऑगस्ट 2023 रोजी अवैध धंद्यावर छापेमारी करत जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जनांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 06 वर्षापासून फरार असलेला लूटमारीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 07/08/2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औराद शहाजनी पोलीस ठाणे हद्दीतील औराद शहाजानी ते कोटमाळ रोड लगत अशोक भंडारे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता तेथे इसम नामे-
1) अंकुश अशोक भंडारे, वय 30, वर्ष, राहणार औराद शहाजानी, तालुका निलंगा.
2) हनुमंत परशुराम बिराजदार, वय 34 वर्ष, राहणार औराद शहाजानी तालुका निलंगा.
3) अतुल मोहनराव भंडारे, वय 22 वर्ष, राहणार औराद शहाजानी झोपडपट्टी, तालुका निलंगा.
4) फयाज हुसेन नाईकवाडे, वय 24 वर्ष, राहणार कोटमाळरोड, औराद शहाजानी, तालुका निलंगा
असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईलफोन व वाहने असा एकूण 98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमूद आरोपींचे विरोधात पोलीस ठाणे औराद शहाजनी येथे कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास औराद शहाजानी पोलीस करीत आहेत.
दिनांक 07/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने आणखीन एक कार्यवाही करत पोलीस ठाणे गांधीचौक येथे सन 2017 मध्ये दाखल असलेल्या कलम 393, 398 मधील लूटमार करणाऱ्या गंभीर गुन्ह्यात 6 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अतिशय सीताफिने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे गांधी चौक यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.
तसेच दिनांक 08/08/2023 रोजी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करत देशी-विदेशी दारूची अवैध विक्रीसाठी एका कारमधून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तोंडारपाटी ते उदगीर जाणारे रोडवर सापळा लावून अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी नामे
1) गोविंद नामदेव बनसोडे, 32 वर्ष, राहणार लोहारा, तालुका उदगीर.
यास दारूचा मुद्देमाल व स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 7 हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
एकंदरीत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकाने कारवाई करत फरार आरोपीला अटक करुन अवैध धंद्यावर छापेमारी केली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, संतोष खांडेकर, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, केंद्रे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.