औसा(प्रतिनिधी)13 ऑगस्ट रोजी लातूर शहरामध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलचा विध्यार्थी म.तकी सैफुल्ला बागवान याने फाईट या इव्हेंट्स मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.म.तकी यास कराटेचे प्रशिक्षण श्रीमान ढोले अजित सरांनी दिलेले असून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाळेच्या वतीने संस्थचे अध्यक्ष शेख रसूलसाब गुरुजी,सुलतान बागवान,सरगुरू इस्माईलसाब,सैफुल्ला बागवान,संपादक मजहर पटेल यांच्या हस्ते म.तकी सैफुल्ला बागवान यास भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व विध्यार्थी,शिक्षिका,पालक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.