सुनील उटगे यांना पितृशोक

सुनील उटगे यांना पितृशोक




 औसा प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरपालिकेचे गटनेते सुनील उटगे यांचे वडील रेवणसिद्धप्पा उर्फ (बाबूप्पा) बसलिंगप्पा उटगे वय 78 वर्ष यांचे रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. दिवंगत रेवणसिद्धप्पा उर्फ बाबुप्पा उटगे हे प्रगतिशील शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भावंडे, तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी सहा तीस च्या सुमारास औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या