सुरत- चेन्नई हायवेबाधीत शेतकऱी पालकमंत्र्यांना घालनार घेराव.

सुरत- चेन्नई हायवेबाधीत शेतकऱी पालकमंत्र्यांना घालनार घेराव.




 महाराष्ट्र रिपोर्टर विशेष वृत्तसेवा
उस्मानाबाद- गत एक वर्षापासुन सुरू असलेल्या सुरत चेन्नई हायवेबाधीत शेतकऱ्यांचे आंदोलन आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर तालुक्यातील बहुमोल अशा बागायती शेतजमिनीतून सुरत- चेन्नई हायवे जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या बागायती शेतजमिनीचे बेकायदेशीररित्या नियम धाब्यावर बसवून भुसंपादन करुन घेतले जात आहे. याच कारणामुळे पालकमंत्र्यांना वारंवार अवगत केले असुन कायदेशीररीत्या शासन प्रशासनाचे गेली एक वर्ष उंबरठे शेतकरी झिजवत आहेत, मात्र सुरत चेन्नई हायवेबाधीत शेतकऱी आता पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे.
       दरम्यान याप्रकरणी मा. जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन उद्या शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितित दिले जाणार असल्याची माहिती सुरत चेन्नई हायवे संघर्ष समिती चे मुख्य समन्वयक महारुद्र जाधव यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या