मूळ पासिंग नंबर व क्रमांक मध्ये छेडछाड करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

 मूळ पासिंग नंबर व क्रमांक मध्ये छेडछाड करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.


        लातूर रिपोर्टऱ प्रतिनिधी
  टॅक्सी परमिट वाहनाचे मूळ पासिंग नंबर व चेसिस क्रमांक मध्ये छेडछाड करून, स्क्रॅप झालेल्या गाड्यांचे नंबर टाकून, बनावट कागदपत्रे तयार करून, शासनाची फसवणूक करणाऱ्या 9 आरोपींना वाहनासह ताब्यात.2 आरोपी फरार. 42 लाख 50 हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे एकूण 9 वाहने जप्त.

             याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री. भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवत होते.
              दरम्यान दिनांक 30/08/2013 रोजी सदर पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही इसमची टोळी परमिट टॅक्सी वाहनच्या मूळ पासिंग नंबर व चेसिस क्रमांक मध्ये छेडछाड करून स्क्रॅप झालेले गाड्यांचे नंबर टाकून त्या वाहनांचे बनावट कागदपत्र तयार करून ते वापरात आणून शासनाची फसवणूक करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर पथकाने सखोल माहिती मिळवून व चौकशीअंती बनावट कागदपत्रे असलेले वाहनासह खालील इसमांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.

 1) बाबू दत्तात्रय घाटे, रा चाटेवाडी, ता अहमदपूर जि लातूर.

 2) शेख सरफराज मिर्झा, करीम नगर, नांदेड नाका, लातूर 

3) रौफ जाफर शेख, पंचशिल नगर, किनगाव.

4).गोविंद विश्वनाथ वनवे, रा. सावरकर चौक किनगाव.

5) रामभाऊ ज्ञानोबा वनवे, सावरकर चौक किनगाव.

 6) ज्ञानेश्वर मोहनराव हाणमंते रा मेनरोड किनगाव.

7) शाम शिवाजी भोसले, रा दत्त नगर सावरकर चौक, किनगाव.

8) अखील जानीमियाँ शेख वय 44 वर्षे रा मिरकले नगर अहमदपूर .

9) ताजोददीन मज्जीदखान पठाण, रा ईस्लामपुरा लातूर.

10)पांडूरंग गोविंदराव फड रा सावरकर चौक किनगाव (फरार)

11)दत्तूसिंग राजरामसिंग ठाकूर, रा कब्रास्तान जवळ किनगाव.(फरार)

असे असून यातील आरोपी क्रमांक 10 व 11 हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

             वर नमूद आरोपींच्या टोळीने अनेक दिवसापासून विविध कंपनीच्या चार चाकी वाहनाचे आरटीओ पासिंग क्रमांक चेसीस क्रमांक यामध्ये बदल करून बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल सदर टोळी विरुद्ध पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक गु.र.नं. 228/2023 कलम 420, 465, 467, 468, 472, 34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याचा पुढील तपास पोलीस ठाणे किनगाव चे पोलीस उपनिरीक्षक तोटेवाड हे करीत आहेत.
                  सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, संतोष खांडेकर, राजेश कंचे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या