पंडित सुंदरलाल कमीटीच्या शिफारस लागु करावे पोलीस अॅक्शनच्या वेळी मृत्यू झालेल्या लोकांचे मृत्यूप्रमाणपत्र नगर पालिकेकडून देण्यात यावेवारसांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषींच्या नावे असलेली संपती जप्त करुन नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत द्यावी.

 पंडित सुंदरलाल कमीटीच्या शिफारस लागु करावे 
पोलीस अॅक्शनच्या वेळी मृत्यू झालेल्या लोकांचे मृत्यूप्रमाणपत्र नगर पालिकेकडून देण्यात यावे
वारसांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषींच्या नावे असलेली संपती जप्त करुन नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत द्यावी.

औसा प्रतिनिधी

सविस्तर वृत असे की एम.आय.एम. औसा व पिडीतांच्या च्या वतीने निवेदन करतात की, सन 1948 हैद्राबाद संस्थान भरतात विलीनीकरण झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या नावावर बहुसंख्य मुस्लीम समुदायाचे संभाव्य झालेले नुकसान आणि हिंदु-मुस्लीम धर्मियात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधानच्या वतीने केंद्र सरकारने मा. पंडित सुंदरलाल कमिशनची स्थापना केली होती या कमिशनने हैद्राबादसह मराठवाडा विभागाचा दौरा करुन केंद्राला आपला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. पंडीत सुदरलाल कमीशनने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी.

हैद्राबाद संस्थान 1948 मध्ये भारतात सामील झाले त्या काळात केंद्र सरकारने पोलीस अॅक्शन कारवाई केली. या कारवाईच्या काळात समाज कंटकाकडून मुस्लीम समाजाच्या जिवीताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असंख्य महिलांवर अत्याचार झाले. अंध, अपंग, निराधार महिलाही त्यामधुन सुटल्या नाहीत. मुस्लीम समाजाची दुकाने लुटण्यात आली. हजारो एक्कर जमीनी बळकावण्यात आल्या, सोने चांदी अशी संपत्ती पळविण्यात आली. असंख्य जण बेवारस झाले. अश्या कुटुंबाच्या व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषींच्या नावे असलेली संपती जप्त करुन नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत द्यावी. तसेच पोलीस अॅक्शनच्या वेळी मृत्यू झालेल्या लोकांचे मृत्यूप्रमाणपत्र नगर पालिकेकडून देण्यात यावे अशी नगर पालिका व ग्रामपंचायत यांना सुचना करण्यात यावी. ही विनंती. अशी मागणी आम्ही मागील 12 ते 14 वर्षापासुन करीत आहोत. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही कार्यवाही करा असे निवेदन राष्ट्रपती कडे तहसीलदार मार्फत दिले आहे त्यावर सय्यद मुजफ्फरअली इनामदार. एम. आय. एम. प्रमुख औसाअॅड. रफिक शेख,,हारुणखाँ पठाण,अजहर कुरेशी शेख नय्युम आदि चे हस्ताक्षर आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या